Hilarious Marathi Jokes |मजेशीर मराठी विनोद | भन्नाट Marathi Jokes

आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण व्यस्त असतो ह्या व्यस्त जगात हे मजेशीर विनोद (Marathi Jokes)वाचून तुम्ही नक्कीच भरभरून हसाल याची आम्हाला खात्री आहे. काही वेळासाठी का होईना आपण आपल्या साऱ्या चिंता विसरून जातो.तुम्ही हे मजेशीर जोक्स आपल्या मित्रांना परिवाराला सुद्धा सेंड करून त्यांना सुद्धा हसायला प्रेरित करू शकता.

funny jokes

देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)

लेटेस्ट पुणेरी किस्सा 😜

जोशी : “मी इथले टाॅयलेट वापरु का ?”
नेने : “हो, पण पैसे पडतील….!”
जोशी : “नाही पडणार…. बसताना काळजी घेईन….!!”

दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला – अरे एक काम होते.
दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.

बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.

बायको: माझी एकअट आहे!
नवरा : काय?
बायको: तूम्ही या दिवाऴीत  सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार. ☺
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…

एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला
मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”
उत्तर – तसं काही नाही.
खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…

नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
नवरा – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…

शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन 😠
.
.
.
.
.
गण्या : ओके सर……पण जरा झणझणीत बनवा

नवरा – जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…
बायको – जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!

Marathi Jokes |

शब्दाने शब्द वाढतो
व शाब्दिक वाद निर्माण होतात
शब्द मनावर खुप वाईट परिणाम करतात,
म्हणून शक्यतो
मारामारी करूनच प्रकरण मिटवावे..!

बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.

तलवार पास होने से कुछ नहीं होता,
तलवार चलाना भी आना चाहीये…
असे status टाकणारे पोर डॉक्टरने
इंजेक्शन काढले की,
मोठमोठ्याने रडतात…!!!

बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.
नवरा – नाही गं.
बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल…

एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…(Jokes)

संता पोलिसात भरती होतो…
एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो…
संता – साहेब, इथं एका महिलेने आपल्या
पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय…!
पोलीस इन्स्पेक्टर – का…?
संता – तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून…
पोलीस इन्स्पेक्टर – मग त्या महिलेला अटक केली का नाही…?
संता – नाही …अजून फरशी थोडीशी ओली आहे…!!!

एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो.
मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.
शेजारून चाललेला एक माणूस – हे काय?
दारुड्या – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…

शिक्षक – “मी तुझा जीव घेईन”
याच इंग्रजीत भाषांतर कर…
पप्पू – ते इंग्रजी गेलं उडत…
तुम्ही हात तरी लाऊन बघा…

शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असते.
मास्तर – गण्या “It” केव्हा वापरतात?
गण्या – घर बांधताना…!
(लई चोपला मास्तरांनी)

जीवनात सर्व काही असावं…!
पण फक्त,
.
.
चड्डीत मुंगी नसावी.

Funny Jokes in Marathi

शिक्षक – बंडू, उठ, मला सांग
45 भागिले 5 बरोबर किती…?
बंडू – 9
शिक्षक – आणि बाकी…?
बंडू – बाकी काही नाही… निवांत…!
तुमचंच सांगा…!
(शिक्षकांनी मरेस्तोवर मारला…)

बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(नवरा वारीला निघालाय…!) (Funny Jokes in Marathi)

बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(नवरा वारीला निघालाय…!)

देव – बाळा काय पाहिजे ते माग…
मुलगा – एक सुंदर बायको…
देव – जर तू मुस्लीम असशील तर,
तुला कतरिना मिळेल,
हिंदू असशील तर दीपिका,
आणि
ख्रिश्चन असशील तर जॅकलिन देईन.
बोल तुझ नाव काय…?
मुलगा (विचार करून) – अब्दुल तुकाराम डिसोजा…
देव – लई दीड शहाणा दिसतोय…
याला शांताबाई द्या रे…!

माझी एक दुःखभरी कहाणी,
ज्यांना मी लहानपणी झोपताना
खूपच सुंदर दिसत होतो तेच,
.
.
.
आता मला झोपेत बघितलं तरी लाता घालतात.

तुमचा मुलगा न सांगताही अचानक प्रसाद
वाढायला पुढे पुढे जाऊ लागला
की,
समजायचं
होणारी सुनबाई आरतीला
आली आहे.

गृहस्थ : काय रे, तुझी आई कशी आहे?
मुलगा : बरी आहे.
गृहस्थ : बहिण कशी आहे?
मुलगा : बरी आहे.
गृहस्थ : अच्छा, मग बाबा तर बरेच असतील?
मुलगा : नाही. बाबा एकच.

एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
काव्या : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.

बाबा- काल रात्री कुठे होतास?
मुलगा- मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा- रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा- काय???
बाबा- तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या….

एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत….

Marathi Jokes in Marathi

हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :-
विजेची तार…

चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात
सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय
माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो
तरी इतका फिटनेस
चिंग टिंग पिंग ऑईल
चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी
तर फिटनेसची चिंता डोंट वरी.

पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…

भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे

बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.

डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?
बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!
(पेशंट फरार आहे…)

एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग
गुरुजी ओळखलंत का मला?
हो ओळखलं ना.
2014 ची तुकडी ना?
.
.
.
3 महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी…

गुरूजी – सांग बर बंडू
कडधान्य म्हणजे काय?
बंडू – गुरूजी, शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते.
त्यास कडधान्य असे म्हणतात.

सर – सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू – झेब्रा.
सर – असं का बरं?
मंजू – कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना…

शिक्षक – न्यूटनचा नियम सांग.
विद्यार्थी – सर पूर्ण नाही येत.
शिक्षक – जितका येतोय तेवढा सांग.
विद्यार्थी – तर याला म्हणतात न्यूटनचा नियम…

शिक्षक – जो मूर्ख आहे त्याने उभा राहा.
पप्पू उभा राहतो.
शिक्षक – तू का उभा राहिलास…?
तू मूर्ख आहे का?
पप्पू – नाही सर, तुम्ही एकटेच उभे होतात
म्हणून मी पण उभा राहिलो.
मला पाहवलं नाही ते.

पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी
बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!
शेजारीण फोन वर – चुकीच पाउल घेऊ नका,
मी विचार करुन सांगेल.(Marathi Jokes)

हेही वाचा

तुमच्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येथे क्लिक करा

Motivational Quotes in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top