Alovera कोरफडीचे औषधी गुणधर्म : त्वचा ,केस,पचनसंस्था आणि बरेच काही

Alovera benefits
Alovera

कोरफड ला मराठी मध्ये “घृतकुमारी” असे सुद्धा म्हटले जाते ,कोरफड ही एक बहुउपयोगी वनस्पती आहे.अगदी सहजपणे उपलब्ध होते .तुम्ही तुमच्या घरात किंवा किंवा घराबाहेर सुद्धा कोरफड सहजपणे लावू शकता . आयुर्वेदिक औषधींमध्ये तर तिचा हजारो वर्षांपासून वापर केला जातोच, पण सध्याच्या सौंदर्य प्रसाधनांमध्येही कोरफडीचा (Aloe Vera ) मोठ्या प्रमाणात वापर होतो.

कोरफडीच्या पानांमध्ये असलेला जिलेटिनसारखा पदार्थ म्हणजेच “कोरफड जेल” (Aloe Vera Gel) औषधी आणि सौंदर्यवर्धक गुणधर्मांनी युक्त असतो.

कोरफडीचे आरोग्यदायी फायदे (Health Benefits of Aloe Vera in Marathi)
कोरफड ही जाड पाने असलेली एक गर युक्त वनस्पती आहे जी पाणी साठवून ठेवते , जी सहज उपलब्ध होते . जर तुमची त्वचेला उन्हाच्या तडाख्या मुळे जळजळ होत असेल तर तुम्ही त्यावर थंड कोरफडीचा गर ठेवू शकता ,यामुळे त्वचेला नक्कीच आराम मिळेल .

त्वचेच्या समस्यांवर (Skin Problems) : त्वचा Repair करण्यासाठी कोरडेपणा दूर करण्यासाठी कोरफड जेल(Alovera Gel) खूप प्रभावी आहे.


बद्धकोष्ठता :

  • बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर ठरतो. तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कोरफडीचा समावेश करू शकता. कोरफडीचा रस पिऊही शकता. याशिवाय सकाळचा नाश्ता करताना एक चमचा कोरफड जेल पाण्यात मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो.
  • कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, असिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी: कोरफडीमध्ये असलेले विविध जीवनसत्वे आणि खनिजे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.


मधुमेहावर: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोरफडचा उपयोग करता येतो (उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

कोरफडीचा सौंदर्यवर्धनासाठी उपयोग (Uses of Aloevera in for Beauty)

Alovera gel
Aloe vera gel
  • तेलकट त्वचा नियंत्रित करण्यासाठी : कोरफडी जेल चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करते.
  • केसांची वाढ आणि चमक वाढवण्यासाठी : कोरफडीचा रस केसांना लावल्याने त्यांची वाढ होते आणि कोंडा येण्याची समस्या कमी होते.
  • त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी : कोरफड त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन त्वचेला मॉइश्चराइझ करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि चेहरा तरुण ठेवण्यासाठी कोरफडीचा उपयोग करता येतो.
  • कोरफड वापरण्याचे मार्ग ( Ways to use aloevera)
  • कोरफडचा वापर वेगवेगळ्या स्वरूपात करता येतो. कोरफडीची पाने थेट तोडून जेल काढून त्वचेवर लावता येते किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोरफड जेलचा वापर करता येतो. कोरफडचा रस किंवा पूड पण आरोग्यवर्धक पेयांमध्ये आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरला जातो.

वजन कमी करणे – शरीराचे वाढलेले वजन कमी करायचे असेल तर कोरफडीचा वापर करणे प्रभावी ठरू शकते. त्यामुळे पचनशक्ती वाढते , ज्यामुळे वजन घटवण्यास मदत होते. त्यासाठी जेवण्यापूर्वी कोरफडीचा रस प्यावा.

कोरफडीचा वापर माऊथ वॉश म्हणूनही केला जाऊ शकतो. याशिवाय तोंडात आलेले ज्वर दूर करण्यासाठीही कोरफड प्रभावी ठरते. कोरफडीचे ॲंटीबॅक्टेरियल आणि ॲंटी-फंगल गुणधर्म तोंडातील जंतू दूर ठेवण्यास मदत करतात.कोरफडीचा रस हा तोंडातील अल्सर बरे करण्यास प्रभावी ठरतो.

मोबाईल, कॉम्प्युटर यांच्या अतिवापरामुळे किंवा झोप न झाल्याने डोळे जळजळ करत असतील, तर पाण्यात कोरफडीचा रस घालून त्याने डोळे धुतल्यास आराम मिळतो. डोळे आले असतील तर कोरफडीचा रस डोळ्यांना लावल्याने फायदा होतो.
जळणं, भाजणं, आग होणं, पित्त होणं या प्रकारच्या त्वचा विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते.

रात्री झोपण्याआधी कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑईल एकत्र करुन त्वचेला लावल्यास काळेपणा, सनबर्न, सुरकुत्या, पिंपल्स हे त्वचा विकार कमी होतात. त्वचा काळवंडली असल्यास कोरफडीमध्ये लिंबाचा रस मिसळून रात्रभर त्वचेला लावून ठेवल्यास फायदा होतो.

कोरफडीमुळे केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. ताजा कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केस गळती थांबते, केस दाट आणि मजबूत होतात. कोरफडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते. आठवड्यातून दोन ते तीन वेळा कोमट खोबरेल तेलात कोरफडीचा रस घालून केसांच्या मुळांना आणि केसांना लावल्याने केसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.

नितळ सुंदर त्वचेसाठी कोरफडीचा उपयोग(Alovera For Skin)

आपलीही त्वचा नितळ, सुंदर आणि डागविरहित असावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण मुरुम, डाग इत्यादी समस्यांमुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. प्रदूषित वातावरण आणि बदलती जीवनशैली यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक नाहीशी होऊ लागते. त्वचेवर ग्लो येण्यासाठी काही जणी भरपूर प्रमाणात केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण कित्येकदा या उत्पादनांमुळे चेहऱ्याचे नुकसान होते. संवेदनशील (sensitive skin) त्वचा असणाऱ्यांनी नैसर्गिक घरगुती उपचार करण्यावर भर द्यावा. पण हे उपाय देखील डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावेत.

कित्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये अ‍ॅलोव्हेरा जेलचा वापर केला जातो. सौंदर्य प्रसाधनांप्रमाणेच कोरफडचा रस देखील चेहऱ्यासाठी लाभदायक आहे. या औषधी वनस्पतीमध्ये ७५ प्रकारचे घटक असतात. ज्यामध्ये मुख्यतः व्हिटॅमिन, खनिजे, सॅलिसिलिक अ‍ॅसिड, लिग्निन, सॅपोनिन यांचा समावेश असतो.

कोरफड जेल (Alovera Gel For Skin) हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी लाभदायक आहे. त्वचेची देखभाल करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. कोरफड जेलमधील पोषण तत्त्वांमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये हर्बल आणि औषधी गुणधर्मांचा साठा आहे. ज्यामुळे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. अ‍ॅलोव्हेरा जेल आपल्या त्वचेसाठी कसे लाभदायक ठरते? जाणून घेऊया याबाबतची सविस्तर माहिती.

कसा करावा कोरफड जेलचा वापर(How to use Alovera Gel)

केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे होणारे दुष्परिणाम पाहता प्रत्येक जण आता आयुर्वेदिक, हर्बल उपचार करण्यावर भर देत आहेत. नैसर्गिक उपचारांमुळे चेहऱ्याला दीर्घ काळासाठी फायदे मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय केल्यास दुष्परिणामही होत नाहीत. कशा पद्धतीने कोरफड जेलचा (aloe vera benefits) त्वचेसाठी वापर करावा, जाणून घेऊया काही नैसर्गिक उपायांची माहिती.

कोरफड आणि काकडी

काकडी व कोरफड एकत्र करून चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास लावा. कोरफड जेल आणि काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीने काकडी – कोरफडचा रस बाउलमध्ये गाळून घ्या. हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. याद्वारे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ईचा (vitamin E)पुरवठा होईल आणि त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल. हवे असल्यास तुम्ही व्हिटॅमिन ई तेलासह देखील कोरफड जेल मिक्स करू शकता. नियमित हे उपाय केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील.


अ‍ॅलोव्हेरा फेस स्क्रब (alovera face scrub)

कोरफड जेल आणि ग्राउंड ओटमील एकत्र घ्या. जाडसर मिश्रण तयार करा. नियमित या स्क्रबचा वापर करावा. ओटमील आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचं कार्य करते. तर कोरफडमुळे त्वचेला थंडावा मिळतो.

चेहऱ्यासाठी अ‍ॅलोव्हेरा लेप:

तुमच्या घरामध्ये कोरफडचे रोपटे असेल तर त्यातील ताजा गर काढून घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हेअर पॅक म्हणूनही याचा वापर होऊ शकतो.


​Benefits of Alovera Gel कोरफड जेल रात्रभर चेहऱ्याला लावण्याचे फायदे:

आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलनं मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेला लाभ मिळतात. सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. कॉटनच्या कापडाने चेहरा पुसून घ्यावा. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर जेल चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुम आणि मुरुमांचे डाग देखील कमी होतात.

(NOTE चेहरा आणि त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे होणारे दुष्परिणाम पाहता प्रत्येक जण आता आयुर्वेदिक, हर्बल उपचार करण्यावर भर देत आहेत. नैसर्गिक उपचारांमुळे चेहऱ्याला दीर्घ काळासाठी फायदे मिळतात आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय केल्यास दुष्परिणामही होत नाहीत. कशा पद्धतीने कोरफड जेलचा (aloe vera benefits) त्वचेसाठी वापर करावा, जाणून घेऊया काही नैसर्गिक उपायांची माहिती.


काकडी व कोरफड एकत्र करून चेहरा आणि डोळ्यांच्या आसपास लावा.

कोरफड जेल आणि काकडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. यानंतर एका स्वच्छ कापडाच्या मदतीने काकडी – कोरफडचा रस बाउलमध्ये गाळून घ्या. हा रस तुम्ही कापसाच्या मदतीने आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. याद्वारे तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन ईचा पुरवठा होईल आणि त्वचा हायड्रेट राहण्यासही मदत मिळेल. हवे असल्यास तुम्ही व्हिटॅमिन ई तेलासह देखील कोरफड जेल मिक्स करू शकता. नियमित हे उपाय केल्यास चेहऱ्यावर सकारात्मक बदल पाहायला मिळतील.
कोरफड जेल आणि ग्राउंड ओटमील एकत्र घ्या. जाडसर मिश्रण तयार करा. नियमित या स्क्रबचा वापर करावा. ओटमील आपली त्वचा एक्सफोलिएट करण्याचं कार्य करते. तर कोरफडमुळे त्वचेला थंडावा मिळतो.

चेहऱ्यासाठी अ‍ॅलोव्हेरा लेप

तुमच्या घरामध्ये कोरफडचे रोपटे असेल तर त्यातील ताजा गर काढून घ्या. यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा नारळाचे तेल मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यावर चेहऱ्यावर लावा. हेअर पॅक म्हणूनही याचा वापर होऊ शकतो.

आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलनं मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. यातील पोषण तत्त्वांमुळे त्वचेला लाभ मिळतात. सर्वप्रथम फेस वॉशने आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. कॉटनच्या कापडाने चेहरा पुसून घ्यावा. यानंतर कोरफड जेल चेहरा आणि मानेवर लावा. आवश्यकता वाटल्यास तुम्ही एसेंशियल ऑइलचाही वापर करू शकता. चेहऱ्याचा हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर जेल चेहऱ्यावर राहू द्या. नियमित स्वरुपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. सोबत मुरुम आणि मुरुमांचे डाग देखील कमी होतात.

FAQ:
Question 1: कोरफड वेरा जेल कशासाठी वापरले जाते?
Answer: विविध प्रकारच्या त्वचेच्या स्थितींसाठी कोरफड वेरा जेलला लोकप्रिय स्थानिक उपचार म्हणून ओळखते. हे त्याच्या सुखदायक आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्मांसाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते सनबर्न, किरकोळ कट आणि कोरडी त्वचा यासारख्या परिस्थितींसाठी उपयुक्त ठरते. काही लोक याचा वापर मुरुमांसाठी किंवा सुरकुत्या कमी होण्यासाठी वापर करतात.

Question 2: आपण दररोज ॲलोवेरा जेल लावू शकतो का ?
Answer: दररोज कोरफड वेरा जेल लावणे बहुतेक लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे .आणि हा आपल्या त्वचेला शांत आणि पोषण देण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो.कोरफड हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे तुमच्या त्वचेला मऊ आणि ओलावा राहण्यास मदत करते. जर तुम्हाला सनबर्न, किरकोळ जखम किंवा त्वचेला खाज येत असेल, तर कोरफड शांत गुणधर्म आराम देऊ शकतात. कोरफड जळजळ कमी करण्यात मदत करू शकते आणि आपल्या दैनंदिन स्किनकेअर दिनचर्यामध्ये एक उत्तम जोड बनू शकते.

Question 3: जळजळ(Burn) कोरफड वापरण्याचे फायदे आणि नुकसान काय आहेत?
Answer: कोरफड जेल (alovera gel for burn) जळजळ शांत करून आणि ऊतींच्या दुरुस्तीला प्रोत्साहन देऊन, सूर्यप्रकाशासह किरकोळ जळजळ शांत करण्यास आणि बरे करण्यास मदत करू शकते. तथापि, ते गंभीर भाजण्यासाठी योग्य नाही आणि खोल जखमा बरे करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.

Question 4: कोरफड त्वचेसाठी चांगले आहे का?(Is alovera good for skin)
Answer: होय, नितळ त्वचेसाठी कोरफड व्हेरा तुमच्या स्किनकेअर दिनचर्यामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता.कोरफड तुमच्या त्वचेला हायड्रेट आणि शांत करते, ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि लवचिक वाटते.

हेही वाचा

सुंदर त्वचेसाठी महत्वपूर्ण टिप्स साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top